पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. मागील ३ आठवड्यांपासून गंभीर स्थिती असल्यानं मुशर्रफ यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झालेत. त्यामुळे मुशर्रफ यांची प्रकृती बरी होण्याची शक्यता धूसर आहे.आंतरराष्ट्रीय मीडियातील बातम्यांनुसार, परवेझ मुशर्रफ आयुष्यातील उरलेला वेळ आपल्या मायदेशात घालवू इच्छितात